तुमचा गेम करायचा आहे अमेरिकेला जाताना अंजली दमानिया यांना धमकी, मोठी खळबळ

Foto
मुंबई : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या नेहमीच त्यांच्या स्पष्ट वक्तव्यांसाठी ओळखल्या जातात. आता त्यांना जीवेमारण्याची धमकी मिळाल्याचे समोर आले आहे. स्वत: अंजली दमानिया यांनी याबाबत माहिती दिली आहे. अंजली दमानिया अमेरिकेत असताना त्यांना धमकी मिळाली होती. तसेच तुमचा गेम करायचा आहे अशी धमकी देणाऱ्याची भाषा असल्याचे अंजली दमानिया यांनी सांगितले.

मिळालेल्या धमकी विषयी बोलताना अंजली दमानिया म्हणाल्या की,  मी अमेरिकेला असताना मला अतिशय खात्रीने एका सूत्राकडून कळलं होतं की तुमच्या जीवाला धोका आहेत.. म्हणजे त्यांची जी भाषा होती ती तुमच्या गेम करायचे आहे. ज्या दिवशी जरांगे पाटलांना धमकी आली त्याच दिवशी मला वाटतं मलाही यांचा फोन आला होता. धमकी देणारे जे लोक आहेत ते सेकंड रँकचे लोक आहेत. तुम्ही काळजी घ्या, तुम्ही गाड्या बदलून बदलून वापरा.

पुढे त्या म्हणाल्या, अतिशय सीनियर व्यक्तींकडून मला माहिती मिळाली आहे. पण मला वाटतं की लढताना या सगळ्या गोष्टीची आपण विचार करु नये. मी याबाबत कोणालाही भेटणार नाही. मी कुठल्याही प्रकारची सिक्युरिटी घेणार नाही. धमकी देणाऱ्या व्यक्तीविषयी बोलताना अंजली दमानिया म्हणाल्या की, त्यांच्याबद्दल मला काहीच माहित नाही. त्यांच्या इनपुट बद्दल मला काही माहित नाही. पण मला जे फोन आला होता ते अतिशय मोस्ट सीनियर लेवल वरून फोन आला होता. आणि खात्रीलायकपणे सांगितलं होतं की यांचे आता अती होत आहे यांचा आता गेम करायचं.

पार्थ पवार प्रकरणावर अंजली दमानिया यांची प्रतिक्रिया

पार्थ पवारांच्या दोन्ही कंपन्यांचा पूर्ण वेलेंटसीटच्या किस केला. रेवेन्यू झिरो, टोटल इन्कम झिरो असा असताना सात ते आठ रुपये त्यांना तोटा म्हणजे या कंपनीत काहीही नाहीये. अशी कंपनी जमीन कसा घेऊ शकते? हा पहिला प्रश्‍न. दुसरा त्यांच्यावर जे  झाला आहेत. त्याच्यावर आजच मी पत्र ड्राप करून पाठवणार.. कारण अथॉरिटी लेटर ज्या व्यक्तीला दिले आहेत त्यांचे काम फक्त दिलेले काम करणं आहे. त्यांच्या लीगल जे आहे सगळं पार्थ पवारांवर आहे.